खो खो स्पर्धेत विद्यापीठ संघाचे करणार प्रतिनिधित्व…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयातील विद्यार्थिनी दिपाली पाटील हिचा आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव तर्फे डॉ.एच एस गौर विश्वविद्यालय सागर (मध्य प्रदेश) या ठिकाणी दिनांक 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत मुलींमध्ये खो- खो स्पर्धेत निवड झाल्याने सहभाग असणार आहे.

या स्पर्धेसाठी मार्गदर्शक प्रा.डॉ.देवदत्त पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. सदर विद्यार्थिनीचे संस्थेचे अध्यक्ष जयंतराव पाटील, उपाध्यक्ष देविदास साळुंखे, सचिव देविदास पाटील आणि सर्व संचालक मंडळ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत देसले व सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी कौतुक करून अभिनंदन केले.







