सुदाम महाजन, मधुकर पाटील, व उमेश काटे यांचा केला सन्मान…
सामान्य ज्ञान परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व बक्षीस वितरण…
अमळनेर:- येथील सुदाम महाजन, मधुकर पाटील, व उमेश काटे यांना प्रतापियन्स प्रेरणा पुरस्कार गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
प्रा डॉ एस.ओ.माळी आणि प्रतापीयन्स परीवार अमळनेर आयोजित स्व.निळकंठ ओंकार माळी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व्याख्यान व भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा व प्रतापीयन्स प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी विचारपीठावर माजी उपप्राचार्य डॉ एस.ओ.माळी,पुरस्कार्थी तहसीलदार सुदाम महाजन, कर उपआयुक्त मधुकर पाटील जळगांव, पत्रकार उमेश काटे व अध्यक्षीय पदी डि.एच. ठाकूर मुख्याध्यापक जी.एस.हायस्कूल हे होते. यावेळी मा. तहसीलदार सुदाम महाजन, आयकर उप आयुक्त मधूकर पाटील, शिक्षक व पत्रकार उमेश काटे यांना माजी उपप्राचार्य डॉ एस.ओ माळी यांच्या हस्ते प्रतापियन्स प्रेरणा पुरस्कार सन्मानपत्र, शाल, श्रीफळ पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. मनोगतात मा.अप्पर तहसीलदार महाजन पुढे म्हणाले की ध्येय मोठे हवे, स्वतः वर विश्वास ठेवा, आरशासमोर उभे राहा,अधिकारी बनण्यापेक्षा ती निभवणे कठीण, अकबर बनायचे का बिरबल हे ठरवा.एमपीएससी, युपीएससी हे जीवन जगण्याचे साधन आहे. अंतीम सत्य नाही,नोकरी करू नका तर नोकरी देणारे बना असे त्यांनी सांगितले. तर आयकर उपआयुक्त मधुकर पाटील यांनी सांगितले कि स्टोरीमधून फक्तं फक्तं आनंद मिळतो. यशामागे मोठा भुतकाळ असतो. स्पर्धा परीक्षेत स्वतः ला झोकून द्या. स्पर्धा परीक्षेच्या तयारीबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले तर पुरस्कार्थी शिक्षक पत्रकार उमेश काटे यांनी त्यांना मिळालेला पुरस्कार तमाम शिक्षक, आईवडील, मूलगी यांना अर्पण केल्या यावेळी सरांच्या आईवडील व मुलीच्या आठवणीत भावना अनावर झाल्या. शेवटी पोष्टमास्तर राहुल पाटील सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचा निकाल घोषित केला. प्रथम-उदय सोनार, द्वितीय-सुशिल धनगर, तृतीय -निलेश कुंभार,राजश्री सोनवणे, उत्तेजनार्थ दिनेश चौधरी, चेतन महाजन, अभिषेक संदानशिव, अतूल राजपूत यांना सन्मानपत्र व रोख बक्षीस मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.स्पर्धा परीक्षा पेपर काढण्यासाठी सहकार्य आरती साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषण मुख्याध्यापक डि.एच ठाकूर म्हणाले कि, यश प्राप्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारची बंधने नसतात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ एस.ओ.माळी यांनी केले. तर सुत्रसंचालन डि.ए. धनगर सर यांनी केले. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्पर्धा परीक्षा प्रमुख विजयसिंह पवार, ब्राम्हणकर सर,दत्तात्रय सोनवणे, शरद पाटील, निरंजन पेंढारे, गोपाल हळपे,चंद्रकांत पाटील, प्रा.भिमराव महाजन,पत्रकार ईश्वर महाजन, रवि मोरे, बी.एस. पाटील पर्यवेक्षक, आर.एल.माळी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते