आजी माजी लोकप्रतिनिधीसह विविध मान्यवरांची दर्शनासाठी उपस्थिती
अमळनेर:- तालुक्यातील गोवर्धन- मारवड येथील भारतातील तीन स्वयंभू कालभैरवनाथां पैकी एक असलेल्या श्रीकालभैरवनाथांचा यात्रोत्सव गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे बंद होता. मात्र यावर्षी कोरोना आटोक्यात आल्याने हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कालभैरवनाथांचे दर्शनासाठी दिवसभर रीघ दिसून आली , यात पाळणे , उपहारगृह व झुल्यांवर बालगोपालांची रात्री उशिरापर्यंत हौस पूर्ण झाली ,काळभैरवनाथ मंदिरात दर्शनासाठी तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधीसह अधिकाऱ्यांनी दर्शन रांगेत उभे राहुन दर्शन घेतले , सकाळी ९ ते रात्री उशिरापर्यंत महाप्रसाद वाटप करून प्रसाद दिला गेला.
माळण नदिकाठावर मारवड – बोरगाव -गोवर्धन परिसरातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या स्वयंभु काळभैरवनाथांच्या दर्शनासाठी नदीपात्रात लाखो भाविकांची गर्दी उसळली. यात महिला वर्गाची हजेरी मोठ्या प्रमाणावर होती. प्रारंभी पहाटे ५ वाजता ढोल नगाड्यांचा निनादात धुप ध्यान मंगल आरती होऊन ६ वाजता ध्वजारोहण झाले. मान्यवर पाच जोडप्याचे हस्ते होमपूजन झाल्यावर सकाळी ९ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत महाप्रसाद भंडारयाचा कार्यक्रम सुरु होता. लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तर भैरवनाथांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. येथील काळभैरवनाथ स्वामी समर्थाचे कुलदैवत असल्याने संपूर्ण राज्यभरातील स्वामी समर्थांचे भक्तगणांची विशेष उपस्थिति होती. तर रात्री निरंकारी भजनी मंडळ दिवसभर भैरवनाथांचा जागर करून सेवा दिली व भाविकांच्या मनोरंजनासाठी माळण नदीच्या वाळूचा पात्रात लोकनाट्य तमाशा झाला .
कालभैरव नाथांचा दर्शनासाठी मान्यवरांची उपस्थिती
अमळनेरचे भूमिपुत्र आमदार अनिल पाटील यांनी पूजन करून दर्शन घेतले , माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, कपिलेश्वर मंदिराचे मठाधिपती महामंडलेश्वर हंसानंद महाराज, माजी आमदार स्मिता वाघ, भैरवी वाघ पलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, ॲड व्ही.आर.पाटील , मार्केटचे माजी सभापती प्रफुल्ल पवार, तहसीलदार मिलिंद वाघ , डीवायएसपी राकेश जाधव , एपीआय जयेश खलाने , पीएसआय विनोद पाटील , औरंगाबाद खंडपीठाचे सरकारी वकील अँड भरत अग्रवाल , अँड .उज्वलाताईअग्रवाल आदी मान्यवरांनी उपस्थिती दिली. तसेच यावेळी भाविकभक्तांकडून चांदीचे पाळणे, चांदीचे डोळे, चांदीचा मुकुट व बांधकामासाठी उदार हस्ते दान मिळाले. मारवड गोवर्धन बोरगाव ग्रामस्थांकडून महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. मारवड पोलीस ठाण्याचे एपीआय जयेश खलाने , पीएसआय विनोद पाटील यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह होमगार्ड पथकांनी चोख बंदोबस्त ठेवला होता ,गोवर्धन व मारवड या दोन्ही ग्रामपंचायतींनी मुलभूत सुविधा पुरविल्या , बसेसच्या फेऱ्या वाढवून ही गर्दीने उचांक गाठल्याने खाजगी वाहन धारकांनी नियमित शुल्क घेऊन भाविकांना मंदिर परिसरात सोडले ,यात्रोत्सव यशस्वीतेसाठी मंदिर संस्थानचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी सलग तीन दिवस परिश्रम घेतले
पाडळसरेत केसरी भैरवनाथ मंदिरावर अष्टमी जयंतीनिमित्त आकर्षक रोषणाई
पाडळसरेत केसरी भैरवनाथ मंदिरावर अष्टमी जयंतीनिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली होती , सकाळीच फुलांच्या माळा चहू बाजूने लावून लोण खुर्दच्या पोलीस पाटील तनुजा पाटील व उदय पाटील यांनी सपत्नीक अभिषेक , पूजा आरती करून औरंगाबाद खंडपीठाचे सरकारी वकील अँड भरत अग्रवाल, अँड .उज्वलाताई अग्रवाल ध्वजारोहण करण्यात आले , मंदिरात सेवेकरी हभप हिरालाल पाटील यांनी नैवेद्य दाखवून दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मंदिर प्रांगणात महाप्रसाद वाटप करण्यात आला , मंडप व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था युवकांनी स्वस्य प्रेरणेने करून कळमसरे व पाडळसरे येथील ग्रामस्थ व भाविकांनी भैरवनाथ अष्टमी उत्सव यशस्वीपणे साजरा करणासाठी परिश्रम घेतले