
पातोंडा ता.अमळनेर – येथील रहिवासी व मुंगसे जि.प. शाळेचे शिक्षक अशोक शांताराम ईसे यांची जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षकांच्या पश्चिम पतपेढीत दि. 20 रोजी झालेल्या निवडणूकीत प्रगती शिक्षक सेना पॅनलमधून उमेदवारी करीत 717 मते मिळवून विजय प्राप्त केला. त्यांच्या विजयाचे पातोंडा व मुंगसे गावातून अभिनंदन केले जात आहे.
सरपंच भरत बिरारी, उपसरपंच नितीन पारधी, ग्रा पं सदस्य दिलीप बोरसे, ग्रामस्थ अनिल बागूल, अमोल चौधरी, रत्नाकर पवार, आबा वाडीले, राजेंद्र वाणी, राहुल चौधरी, किशोर पाटील, प्रशांत खैरनार, राकेश पाटील, मंगल पारधी व संभाजी बोरसे, जि प शाळा पातोंडा, श्री दत्त विद्या मंदिर मुख्याध्यापक व कर्मचारी आदींनी घरी भेट घेऊन सपत्निक सत्कार करून अभिनंदन केले. पॅनल प्रमुख रावसाहेब पाटील, मतदार बंधू भगिनी यांच्या सहकार्याने विजय प्राप्त झाल्याने अशोक ईसे यांनी सर्वांचे आभार मानले.







