अमळनेर:- शहरातील सुभाष चौक भागात हातात धारदार तलवार घेवुन फिरणाऱ्या एकाच्या अमळनेर पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना माहिती मिळाली की, शहरातील जुना पारधीवाडा भागातील राहणारा राजेश उर्फ दादु एकनाथ निकुंभ हा अमळनेर शहरातील सुभाष चौक भागात हातात धारदार तलवार घेवुन दहशत दाखवत फिरत आहे. त्यावरुन पो हे काँ. कपिलदेव पाटील, पोना. मिलींद भामरे, पोना. लक्ष्मीकांत शिंपी, पोना. सुर्यकांत साळुंखे यांनी भेट दिली असता पटेल कॉम्पलेक्स जवळील गल्लीत मध्ये एक इसम हातात तलवार घेवुन दहशत माजवित फिरत असतांना दिसला. तेव्हा त्यास पोलीस पथकाने अत्यंत शिताफिने ताब्यात घेतले असता त्याच्या जवळून एक धारदार पात्याची स्टीलची तलवार, एक लाकडी मुठीचा चाकु मिळुन आला आहे. त्याच्यावर अमळनेर पोलीसात शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४/२५ सह मु.पो. का. क. १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सफौ. रामकृष्ण कुमावत हे करीत आहे. अमळनेर पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक एम. रामकुमार, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उप विभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव सो यांच्या सुचनेप्रमाणे व पो.नि. विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाने पोहेकाँ. कपिलदेव पाटील, पोना. मिलींद भामरे, पोना. लक्ष्मीकांत शिंपी, पोना. सुर्यकांत साळुंखे यांच्या पथकाने पार पाडली.