अमळनेर न्यायालयाने सुनावली शिक्षा, चोपडा तालुक्यातील घटना…
अमळनेर:- अल्पवयीन बालिकेला बोरे खाण्याचे आमिष देवून अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीस अमळनेर न्यायालयाने ७ वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
चोपडा तालुक्यातील एका गावात दिनांक १० जानेवारी २०२२ रोजी दुपारी बालिकेला आजी कडे सोडून आईवडील मजुरीला गेले असता त्यावेळी आरोपी बाबुला बारकु भील याने बालिकेला बोरे खाण्याचे आमिष दाखवून नाल्यात अतिप्रसंग करत असताना गावातील एकाची नजर त्याकडे गेली असता आरोपी पळून गेला होता. आरोपीविरुद्ध ११ जानेवारी रोजी चोपड़ा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. दि. १९ जानेवारी पासून आरोपी अटकेत होता. अमळनेर न्यायालयात दोषारोप दाखल केले असता सदर कामी जिल्हा व अति सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी साहेब यांच्यापुढे सदरच्या खटल्याचे कामकाज चालले. त्यात सरकारी वकील ॲड. किशोर आर. बागुल, मंगरूळकर यांनी एकुण 07 साक्षीदार तपासले. पैकी बलिकेची साक्ष तसेच गावातील पंच व पिडीतेची आई, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार भाउलाल कोळी व तपासी अधिकारी जी.सी तांबे यांची साक्ष ग्राह्य धरून आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने भा.द.वि. कलम ३५४ बी प्रमाणे 7 वर्ष शिक्षा, पोक्सो ॲक्ट कलम 8 प्रमाणे 05 वर्षे शिक्षा दिली असून दोन्ही शिक्षा एकत्रीतरित्या भोगावयाच्या आहेत.