
ग्रामीण रुग्णालय व आयसिटीसी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजन…
अमळनेर:- जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने अमळनेर ग्रामीण रुग्णालय व आयसिटीसी विभाग विद्यमाने १ ते १५ डिसेम्बर एड्स जनजागृती पंधरवाडा निमित्त अमळनेर बस स्थानक परिसरात एच.आय.व्ही. जनजागृती करण्यात आली.

यावेळी बसस्थानक परिसरात महाविद्यालयीन तरुण तरुणी, विविध प्रवासी,चालक – वाहक तपासणी करण्यात आली. सदर जनजागृती कार्यक्रमात डेपो मॅनेजर इम्रान पठाण , प्रमुख पाहुणे म्हणून एआरटी विभाग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शिंदे होते. ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश ताळे यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले.त्यावेळी उपस्थित सर्वांना एच आय व्ही वर आधारित पोस्टर दाखविले गेले. एच आय व्ही तपासणी व मार्गदर्शन, कोविड लसीकरण करण्यात आले .बस स्थानक परिसरातील एस टी कर्मचारी, प्रवासी, युवक-युवती यांनी उत्फुर्त संख्येने सहभाग दर्शविला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कार्यक्रमचे नियोजन व सूत्रसंचालन आयसिटीसी समुपदेश अश्वमेघ पाटील यांनी केले. आयसिटीसी देवेंद्र मोरे, आरटीसी समुपदेशक जयेश मोरे, लिंक वर्कर ओआरटी आरती मोरे, क्षयरोग विभागाचे गणेश कुवर यांनी तपासणी व मार्गदर्शन केले. आयसिटीसी समुपदेशक दिपक शेलार यांचे विशेष सहकार्य लाभले.
प्रतिक्रिया…
बस स्थानक परिसरात क्षयरोग बाबत महाविद्यालयातील तरुण, व प्रवासी नागरिकांनी माहिती घेतली.जिल्हा व तालुका टीमने खूपच छान मार्गदर्शन केले गेले. अशी जनजागृती नेहमी व्हावी ही अपेक्षा.
योगेश घोडके, वाहक निरीक्षक (एसटी पास विभाग ,अमळनेर)




