अमळनेर:- महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या बेळगाव प्रश्नी असणाऱ्या वादात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी चिथावणीखोर विधान केल्याने अमळनेर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून जाहिर निषेध करण्यात आला.
बेळगांव मध्ये मराठी भाषिक नागरिकांचे प्राबल्य आहे.असे असतांना देखील बेळगांव ला महाराष्ट्रातून तोडण्यात आल्याने तेथील नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.गेल्या 50 वर्षांपासून तेथील जनता महाराष्ट्रात येण्यासाठी झगडत आहेत.नुकताच हा प्रश्न कर्नाटक चे मुख्यमंत्री यांच्या अपूर्ण अभ्यासामुळे चव्हाट्यावर आला आहे. जानेवारी 2007 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सीमावाद ह्या तंट्यावर सुनावणी घेतली होती. 1956 रोजी बेळगाव मधील रहिवाशी यांनी स्पष्ट बहुमत दिले होते.आज बेळगाव 3/4 टक्के लोकसंख्या मराठी भाषिक असतांना कर्नाटक चे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेळगाव हिसकावण्यासाठी चिथावणी खोर वक्तव्य करून महाराष्ट्राचा अपमान केला आहे. तरी महाराष्ट्राकडे द्वेष भावनेने बोटे दाखवणाऱ्याची बोटे शिवसेना कर्नाटकात येऊन पिरघळल्याशिवाय राहणार नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या वक्तव्याचा शिवसेनेतर्फे सकाळी बसस्थानकाजवळ जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख श्रीकांत पाटील, उपजिल्हाप्रमुख कल्याण पाटील, शहर प्रमुख सूरज परदेशी,बाळा पवार, विश्वास महाराज, प्रताप शिंपी, चंद्रशेखर भावसार, ज्ञानेश्वर पाटील ,मनिषा परब, उज्ज्वला कदम , सुनीता माने, सुलतान खान, नितीन निळे, सुन्नूबाई सोनावणे ,जीवन पवार, मोहन भोई,अनिल पाटील, अल्पेश पाटील, प्रमोद शिंपी, भरत जाधव, देवेंद्र देशमुख, विमल बाफना,उमेश अंधारे,मयूर पाटील, मनोज सैनानी आदी उपस्थित होते.