
१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून एलसीडी टीव्हीचे वितरण…
अमळनेर:- तालुक्यातील दहिवद ग्रामपंचायतीकडून “गाव विकास आराखडा” अंतर्गत १५ व्या वित्त आयोगाचा निधीतून आठ एलसीडी टिव्ही जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेला ग्रामपंचायत मार्फत देण्यात आल्या.
यावेळी शालेय व्यवस्थापन समिती यांच्या मार्फत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गावातील प्रविण काशिनाथ माळी मा. उपसरपंच दहिवद हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. प्रमुख मान्यवर सरपंच देवानंद बहारे, गोकुळ माळी, गुलाब पाटील, ग्रा.प.सदस्य शिवाजी पारधी, रवींद्र माळी, पंकज देसले, अनिल माळी, सुवर्णा संदीप माळी, जिजाबराव माळी, तसेच सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नाकर दहिवदकर यांनी केले. शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक वृंद यांनी आलेल्या पाहुण्यांचा सत्कार केला. मुख्याध्यापक रमेश पाटील यांनी आभार व्यक्त केले.







