अमळनेर:- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक रेस्ट हाऊस येथे पार पडली.
अमळनेर विधानसभा मतदारसंघात पक्षाचा प्रचार प्रसार केल्याने नवनवीन कार्यकर्त्यांचा पक्षामध्ये प्रवेश होत आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणूकीत आपले उमेदवार कसे निवडून येतील याबाबत चर्चा व विचार विनिमय करण्यात आला. सर्व पदाधिकाऱ्यांनी नवीन वर्षात उत्साहात पक्ष उभारणीचे काम करू असा निर्धार व्यक्त केला. यावेळी तालुकाध्यक्ष संदीप पाटील, शहराध्यक्ष धनंजय साळुंखे, उपशहराध्यक्ष करण पाटील, शहर सचिव निलेश भावसार, तालुका सचिव सागर पाटील, रस्ते आस्थापना तालुका संघटक विजय लक्ष्मण पाटील, शहर संघटक सुनील पाटील, उपशहर संघटक करण पाटील, विभाग अध्यक्ष बापू चौधरी, जानवे गट अध्यक्ष अमृत पाटील, दहीवद गट अध्यक्ष वसंत पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.