अमळनेर:- महाराष्ट्र राज्य (शासनमान्य) अपंग कर्मचारी संघटना जिल्हा जळगांव यांचे तालुकास्तरीय दिव्यांग कर्मचारी बांधवांचा मेळावा अमळनेर येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गोकुळ आनंदा पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष रविंद्र लोटन पाटील, व रावसाहेब मांगो पाटील हे होते. कार्यक्रमात उपस्थित रावसाहेब पाटील यांनी दिव्यांग संघटनेबद्दल माहिती दिली व आपल्या अनुभव कथन केला. व पुढील काळात अपंग संघटनेसाठी आपण सगळ्यांनी एक होऊन एक दिलाने काम करण्याची सर्व सदस्यांना सांगितले. व पुढील काळात अपंगांच्या कोणत्याही समस्या राहणार नाहीत यासाठी सर्वांना आश्वासित केले. त्यानंतर रवींद्र लोटन पाटील यांनी संघटनेच्या आजपर्यंत केलेल्या कामाची माहिती दिली व पुढील काळात आम्ही आता सर्व एकत्र येऊन पुढील काळात सर्व समस्या दूर होतील, कुठलीही समस्या जळगाव जिल्ह्यात अथवा राज्यात राहणार नाही याबद्दल सर्वांना ग्वाही दिली. यावेळी अमळनेर तालुक्याची कार्यकारीणी घोषित केली त्यात तालुकाध्यक्ष म्हणून छगन पंढरीनाथ पाटील, उपाध्यक्ष धिरज सुकलाल पाटील, सचिव रविद्र धुळाराम लांबोळे, सरचिटणीस विजय आनंदा पाटील यांची एकमताने निवड घोषित केली. पुढील काळात सर्वांनी एक दिलाने काम करावे दिव्यांग बांधवांची कोणतीही समस्या राहणार नाही अशा शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आर.टी. सैदाणे व वाल्मिक मराठे यांनी मनोगत व्यक्त केले. गोकुळ आनंदा पाटील यांनी आपल्या मागील काळात केलेल्या कामाची माहिती दिली. कार्यक्रमासाठी दिव्यांग संघटनेचे जळगांव जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील,भडगाव तालुका अतिरिक्त गटविकास अधिकारी आर.टी.सैदाणे, पी.डी. धनगर, रविंद्र साळुंखे, सुनिल महाजन, विनोद धनगर, विशाल शिंपी, सईदशा फकीर, वाल्मिक मराठे, सचिन वाघ,व अशोक ईसे, अनिल पाटील, भारती पाटील भागवत हाडपे, नाना कोळी, राजेंद्र सोनवणे, संदिप वाघ, जितेद्र शेटे, पाठक दादा, ताडे दादा, शरद सोनवणे, दिलीपराव सोनवणे व बहुसंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक छगन पाटील यांनी तर सुत्रसंचालन विजय पाटील यांनी केले. आभार विठ्ठल पाटील यांनी मानले.