
जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांचे उपस्थितीचे आवाहन…
अमळनेर:-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक देशभक्तीपर गीतांचे तसेच संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यासाठी सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत असतांना “काय कमावलं काय गमावलं”, तसेच “शासकीय सेवेतली पहिला टप्पा” व “सेवानिवृत्ती नंतरचा दुसरा टप्पा” या विषयांवर नॅनो शास्त्रज्ञ प्रा.डॉ.एल.ए.पाटील तसेच नोबेल फाउंडेशन चे जयदीप पाटील मार्गदर्शन करणार आहेत.यावेळी अध्यक्षस्थानी आमदार अनिल भाईदास पाटील असतील.
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात सकाळी 11 वाजता हा संवाद मेळावा होणार आहे.या कार्यक्रमासाठी जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांनी अमळनेर विधानसभा मतदारसंघातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी व नागरिकांना उपस्थितीचे आवाहन केले आहे.




