
अमळनेर:- पं. नेहरू समाजकार्य महाविद्यालयाच्या हिवाळी शिबिराचा एकरुखी येथे दिनांक ३० जानेवारी रोजी समारोप करण्यात आला.

एनएसएसच्या हिवाळी शिबीराचे २४ जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात आले होते. याप्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. या शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शन झाले. विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील माहिती संकलीत करण्याबाबत माहिती देण्यात आली. तसेच आरोग्य तपासणी करण्यात आली. ग्रामस्वच्छता, पथनाट्य व श्रमदान आदी उपक्रम दत्तक ग्राम एकरूखी येथे राबविण्यात आले. या शिबिराच्या समारोप प्रसंगी अभिजित भांडारकर, सरपंच मनिषा भिल, सुरेश पाटील प्राचार्य डॉ पी एस पाटील हे मान्यवर उपस्थित होते. शिबीर यशस्वी करण्यासाठी शिबीराच्या समन्वयक डॉ. श्वेता वैद्य, प्रा डी आर ढगे तसेच डॉ अस्मिता सरवैया, प्रा. विजयकुमार वाघमारे, डॉ. भरत खंडागळे, डॉ. जगदीश सोनवणे, डॉ. सागरराज चव्हाण, सर्व शिबिरार्थी तसेच एकरूखी येथील सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केले.




