
अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलीसात गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील तांदळी येथील १५ वर्षीय मुलीस अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने मारवड पोलीसात दिली आहे.
.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २६ रोजी सकाळी ५:३० वाजेच्या सुमारास सदर १५ वर्षीय मुलगी घरात न दिसल्याने आजूबाजूला परिसरात व नातेवाईकांकडे तपास केला असता कोणतीही माहिती मिळून न आल्याने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लावून पालकांच्या कायदेशीर रखावालीतून पळवून नेल्याची तक्रार रेखाबाई मगन भील यांनी दिली आहे. याबाबत कलम ३६३ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे. कॉ. सचिन निकम हे करीत आहेत.







