उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तबगार महिलांचा होणार सन्मान…
अमळनेर:- नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमतर्फे महिला दिनी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.
८ मार्च रोजी “जागतिक महिला दिनी या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असून अनेक महिलांनी आपल्या समाजाला नवीन दिशा देण्याचे कार्य केलेले आहे. म्हणून समाजातील अशाच सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, राजकीय, कृषी, क्रीडा, विज्ञान तंत्रज्ञान, व्यावसायिक, उद्योग इत्यादी अनेक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून समाजात एक आदर्श निर्माण करणार्या कर्तबगार महिलांचा “महिला रत्न पुरस्कार” नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम भारततर्फे गौरविण्यात येणार आहे. सदर पुरस्कार सोहळा प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते धुळे येथे वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी पुरस्कारासाठी नामांकन पाठविण्याचे आवाहन करण्यात येत असून अधिक माहितीसाठी प्रमोद पाटील (९८८११९४८१६) प्रिया पाटील (७०३०७७७८४८) व जळगाव जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सीताराम पाटील (७३५०४३५८६६) यांच्याशी संपर्क साधावा.