त्वरित उपाययोजना करण्याची प्रा. सुभाष पाटील यांची मागणी…
अमळनेर:- शेतकऱ्याने घरात साठवून ठेवलेल्या कापसात झालेल्या किडींच्या प्रादुर्भावामुळे बळीराजा हैराण झाला असून आरोग्य विभागाने यावर उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
भाव कमी असल्याने जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कापूस घरात साठवून ठेवला आहे. त्यात झालेल्या अज्ञात किड्याच्या संसर्गामुळे पूर्ण शरीराला खाज सुटणे, अंगावर लाल पुरळ, लाल चट्टे असे प्रकार शेतकऱ्याच्या घरातील सदस्यांना होत आहे. योग्य भाव नसल्याने कापूस विकू पण शकत नाही आणि संसर्गामुळेमुळे घरात राहू शकत नाही हा त्रास बळीराजा भोगत आहे. त्यामूळे जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने तत्काळ सरकारी खर्चाने कापसावर औषधाची फवारणी करावी अशी मागणी किसान काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा सुभाष पाटील यांनी केली आहे.