
संवेदनशील भागात प्रभावी गस्त घालत ठेवले नियंत्रण…
अमळनेर:- अमळनेर शहरात शिवजयंतीनिमित्त अमळनेर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत शांततेत उत्सव पार पाडण्यात सहकार्य केले.
श्री. छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अमळनेर पो. स्टे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी पोलीस स्टेशनचे चार दुय्यम अधिकारी व साठ अंमलदार, स्थानिक गुन्हे शाखेचे दहा अंमलदार, सायबर पोलीस स्टेशनचे दहा अंमलदार, आरसीपीचे पंधरा अंमलदार, चाळीस होमगार्ड यांचे योग्य ते नियोजन करून योग्य ठिकाणी नेमणूक केली. शहरात ओपन जीप गस्तीसोबत दंगा नियंत्रण पथक तसेच तहसीलदार मिलिंद वाघ, कार्यकारी दंडाधिकारी यांच्या सोबत घेऊन समिश्र वस्तीत प्रभावी गस्त केली. तसेच सर्व संवेदन भागात पायी गस्तीसाठी विशेष पथक नेमले असून मोटर सायकल गस्त सुरू ठेवल्या होत्या. ग्रामीण भागात देखील पाच मोटर सायकल गस्त घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या असून तसेच सोशल मीडियावर देखील लक्ष देऊन ज्यांनी आक्षेपार्ह स्टेटस, व्हिडिओ लावले होते अशांना समक्ष बोलवत सक्त ताकीद दिली. नियोजनपूर्वक व नियंत्रणात बंदोबस्त ठेवत अमळनेर पोलिसांनी शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा करण्यात महत्वाचे सहकार्य केले.







