
महाविद्यालयात पथनाट्य, निबंध स्पर्धेचे केले होते आयोजन…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यातर्फे कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
तालुका वैद्यकीय अधिकारी गिरीष गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली मारवड येथील कै. न्हानभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविदयालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी “करुया कृष्ठरोगावर मात” या विषयावर पथनाटय सादर केले. सादर कर्ते विदयार्थी प्रताप सिंग भिल, मनियार रफिक, गणेश मोरे, आकाश पाटील, नाजमिन पठान , पुनम भिल, हर्षाली पाटील, विनायक चौधरी, अजय भिल हे होते. सु.हि मुंदडे येथे निबंध स्पर्धा घेण्यात आली. यावेळी आरोग्यसेवक योगेश वाल्मीक कापडणे यांनी आजाराबाबत समाजात जे गैरसमज आहेत ते कसा दुर करता येतील याबाबत माहिती देत हा सखोल माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैदयकीय अधिकारी निखील पाटील, डॉ. विदया देवरे, तालुका कुष्ठरोग सहायक आर.सी. बारेला, तज्ञ एस.एन पवार, प्राचार्य वंसत देसले, डॉ. संजय पाटील, प्राचार्य एल जी चौधरी, शिक्षक वृंद, विदयार्थी, आरोग्य सहायक आर.वाय.पाटील, इकबाल शेख, योगेश कापडणे, आशा सेविका संगीता चौधरी, वैशाली पाटील यांनी प्रयत्न केले. निबंध स्पर्धत प्रथम क्रमांक मनस्वी लक्ष्मीकांत वाणी, द्वितीय क्रमांक कामीनी दगडू पाटील, तृतीय क्रमांक प्रांजल सुनिल साळुंखे यांनी मिळवले.







