ग्लोबल स्कॉलर फाउंडेशनतर्फे पोपटराव पवार यांच्या हस्ते केला सन्मान…
अमळनेर:- तालुक्यातील बाम्हणे येथील रहिवासी प्रतिक पाटील यांना बांधकाम क्षेत्रातील “पर्यावरणपूरक आर्किटेक्ट & इंटेरियर प्लॅनिंग” यासाठीचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ग्लोबल स्कॉलर फाउंडेशन तर्फे जळगाव भूषण पुरस्काराने पुणे येथे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
बाम्हणे येथील बांधकाम क्षेत्रातील तज्ञ प्रतिक पाटील व त्यांच्या वास्तुश्री ग्रुपला अण्णाभाऊ साठे सभागृह (पुणे) येथे सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक डॉ. प्रज्ञा पाटील व कृषी रत्न डॉ. संजीव माने हे प्रमुख अतिथी होते. महाराष्ट्र व गोवा या राज्यांच्या कार्यक्षेत्रातील पर्यावरणपूरक बांधकामाची दखल घेत वास्तुश्री संस्थेला हा राष्ट्रीय पुरस्कार बहाल करण्यात आला. वास्तुश्री टिम आज संपुर्ण महाराष्ट्रात त्यांचे हे कार्य करत आहे. आजपर्यंत 2000 पेक्षा अधिक वास्तु साकारून वास्तुश्री ग्रुप ने त्यांचा वेगळा ठसा निर्माण केला आहे. मागील १० वर्षापासून प्रतिक पाटील व वास्तुश्री संस्था संपूर्ण महाराष्ट्रात आर्किटेक्ट व इंटिरियर सेवेच्या माध्यमातून प्रत्येक माणसाचे घर अत्यल्प दरात व शास्त्रोक्त पद्धतीने व पर्यावरणपूरक पद्धतीने कसे साकारता येईल यावर भर देत आहे.वास्तुश्री टीम व त्यांच्या कामाची पद्धत आणि डिजिटल इको होम या अभिनव संकल्पनेच्या माध्यमातून पर्यावरणाची काळजी घेऊन इको फ्रेंडली वास्तू उभी करण्यावर त्यांचा भर असल्याने त्यांच्या कामाची दखल व येणाऱ्या काळात या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहेत. या कार्याची दखल घेत ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
ह्या बातम्या देखील वाचा
December 22, 2024