साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन…
अमळनेर:- दोन मार्चपासून इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू होत आहे. त्यानिमित्त साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील केंद्र क्रमांक 3106 ची केंद्रस्तरीय गैर मार्गाशी लढा अभियान सभा संस्थेचे सहसचिव अशोक खंडेराव बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. कार्यक्रमाला संस्थेचे माजी अध्यक्ष गुणवंतराव पाटील केंद्र संचालक तथा मुख्याध्यापक सुनील पाटील, डॉ. मनीषा भावे मुख्याध्यापिका अनिता बोरसे, मुख्याध्यापिका जाॅईस मॅडम उपस्थित होते.
यावेळी राजभाषा गौरव दिनानिमित्ताने कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच मराठी भाषेच्या विषयी महती सांगण्यात आली. यावेळी विलास चौधरी, दिलीप पाटील, अरुण पाटील, विद्या पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी सूत्रसंचलन डी ए धनगर तर आभार दिलीप पाटील यांनी मांडले. केंद्राध्यक्ष सुनील पाटील यांनी नियोजित परीक्षेत झालेला बदल विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिला. तसेच परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गैरमार्ग खपवून घेतला जाणार नाही, विद्यार्थ्यांच्या आहाराविषयी व तब्येतीविषयी पालकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे व बोर्डाच्या नियमाने परीक्षा सुरळीत होईल याविषयी मार्गदर्शन केले. तसेच पालकांना असलेल्या अडी अडचणी समजून घेवून विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना भयमुक्त व भीती मुक्त परीक्षा होतील याविषयी शाश्वती मिळाली. शेवटी डी ए धनगर यांनी कॉपी मुक्त परीक्षा होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा दिली. शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी आम्ही कॉपी करणार नाही व आमच्या मित्रांनाही कॉपी करू देणार नाही अशी ग्वाही दिली व कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक बाविस्कर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. साने गुरुजी कन्या हायस्कूल, साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय, सेंट मेरी व ग्लोबल व्ह्यूज स्कूलचे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.