
अमळनेर:- येत्या दि.१४ मार्च २०२३ मंगळवार पासून राज्य सरकारी, निमसरकारी, कर्मचारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती व राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अन्यायकारक एनपिएस रद्द करून जुनी पेन्शन योजना (महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम १९८२ व नियम १९८४) पुन्हा पूर्ववत लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना राज्यव्यापी बेमुदत संपात संपूर्ण ताकदीने सहभागी होत आहे.
याप्रसंगी अमळनेर तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन संघटना (ज्युक्टो) शाखा-प्रताप महाविद्यालय, अमळनेर तर्फे १४ मार्च रोजी होणाऱ्या संपात सहभागाबद्दल प्रताप महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपप्रचार्य यू.जी. मोरे, संघटना अध्यक्ष प्रा.दिनेश बोरसे, उपाध्यक्षा प्रा. मंदाकिनी भामरे, सचिव प्रा.स्वप्निल पवार ,जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.सुनिल पाटील, जिल्हा कार्यकारीणी सदस्य प्रा.डी. व्ही. भलकार, प्रा. जी.एल. धनगर प्रसिद्धी प्रमुख प्रा.किरण पाटील, कार्यकारिणी सदस्य प्रा.प्रशांत ठाकूर, प्रा. आर.एस. महाजन,प्रा.योगेश वाणी, प्रा.रोहिणी पाटील, प्रा.कविता माळी,प्रा.मनीषा पाटील, प्रा.कामिनी खैरनार, प्रा.सविता पाटील,प्रा.श्वेता पाटील आदी उपस्थित होते. तसेच पर्यवेक्षक प्रा. आर.एम. पारधी, प्रा.ए.के.अग्रवाल, प्रा. सी.बी. सुर्यवंशी प्रा.व्हि.एस. पाटील, प्रा.शालिनी पवार, प्रा.जे.एस. संदानशिव, प्रा.बी.आर. गुलाले, प्रा.विलास पाटील, प्रा. दिपक पवार, प्रा.बी.आर. संदानशिव प्रा. डी.के.तायडे, प्रा.डी.एन. वानखेडे, प्रा.विनोद माळी,प्रा.पंकज तायडे, प्रा.बी.एस. शेलकर, प्रा.एस.एस. भांडारकर,प्रा.गुणवंत पाटील, प्रा.मेघना पाटील मॅडम, प्रा.प्रतिमा लांगडे मॅडम, प्रा. प्रतिभा पाटील, प्रा. जागृती पाटील मॅडम,प्रा.पूनम शिंदे मॅडम आदि शिक्षकांच्या निवेदनावर सह्या आहेत.




