यशस्वी विद्यार्थिनींचा महाविद्यालयाच्या वतीने गौरव…
अमळनेर:- कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि झेड.बी.पाटील महाविद्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै.भास्कर सबनिस वाणिज्य व व्यवस्थापन प्रश्नमंजुषा व सादरीकरण स्पर्धा झेड. बी. पाटील महाविद्यालय धुळे येथे पार पडली. या स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले.
या स्पर्धेत धुळे, नंदुरबार, जळगाव या तीनही जिल्ह्यातील 11 महाविद्यालयातील संघ सहभागी झाले होते. सदर स्पर्धेमध्ये प्रताप महाविद्यालयाला प्रथम क्रमांकाचे सांघिक पारितोषिक प्राप्त झाले. या स्पर्धेमध्ये प्रताप महाविद्यालयाच्या वतीने गुंजन मोहन जैन, अनुराधा थावरानी, अंजली तोलानी यांनी सहभाग घेतला. सदर स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना वाणिज्य व व्यवस्थापन प्रशाळेचे प्रमुख डॉ. योगेश तोरवणे तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापिकांनी मार्गदर्शन केले. खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष हरी भिका वाणी, कार्योपाध्यक्ष योगेश मुंदडे, संचालक मंडळ, चिटणीस तसेच प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी.जैन आणि सर्व उपप्राचार्य, समन्वयक व सर्व प्राध्यापक बंधू भगिनीं व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वीतांचे अभिनंदन केले.