चौबारी येथील घटना, मारवड पोलिसांत गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील चौबारी येथे विना परवाना देशी दारू विकणाऱ्या एकाला मारवड पोलिसांनी रंगेहाथ पकडत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चौबारी गावाबाहेर एक इसम विना परवाना देशी दारू विकत असल्याची माहिती मिळाल्याने पो.हे. कॉ. फिरोज बागवान, सचिन निकम, पो.ना. सुनील तेली यांनी छापा टाकला असता गावाबाहेर एका हॉटेल जवळ ज्ञानेश्वर नामदेव पाटील हा देशी दारूच्या बाटल्यासह मिळून आला. त्याच्या जवळून एकूण ९८० रू. किमतीच्या देशी दारूच्या १४ बाटल्या मिळून आल्या असून पोलिसांत मु.प्रो. ॲक्ट ६५ इ अन्वये नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.