
महसूल प्रशासनाचा किसान काँग्रेस व शेतकऱ्यांकडून निषेध…
अमळनेर:- नियमित कर्जदार शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या अमळनेर महसूल प्रशासनाचा निषेध व्यक्त करत मंगळवारी तहसील कार्यालयात सकाळी 11 वाजता काळी गुढी उभारत आंदोलन किसान काँग्रेसकडून करण्यात आले.
यावेळी तहसीलदार मिलिंद वाघ यांनी भेट देऊन चर्चा केली व शासन निर्णय व निकष पाहून उरलेल्या शेतकऱ्यांना मदत केली जाईल असे आश्वासन दिले. सप्टेंबर 2019 च्या अतिवृष्टी झालेल्या गावांत सोनखेडी, दापोरी बु, ,दरेगाव, मारवड, पाडळसरे , कळमसरे, बोरगाव, गोवर्धन, शहापूर, तांदळी, एकतास, प्रगणे डांगरी, अमळगाव, निंभोरा, दोधवद, हिंगोणे खु, हिंगोणे सिम, सात्री, गांधली, मुडी, हिंगोणे बू, पिंगळवाडे, मेहेरगाव, खेडी सीम, भरवस, लोण पंचम, बोदर्डे, चौबारी, भोरटेक, पाडसे, सबगव्हाण, वासरे, खर्दे, खेडी, बाम्हणे, एकलहरे, भिलाली, कळंबे, निम या गावांचा समावेश असून सर्व गावांमध्ये तीन वर्षांच्या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जिल्ह्यातील तालुक्यातील पदाधिकारी यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर 2019 मध्ये अतिवृष्टीचे अनुदान मिळाले आहे. मात्र सन 2019 मधील नियमित कर्जदार शेतकर्यांना 46 हजार अधिक व्याजाची रक्कम भेटून द्यावी, याबाबत अमळनेर तहसीलदार तसेच जिल्हा उपनिबंधक यांना वेळोवेळी लेखी व तोंडी निवेदने देण्यात आली होती. जिल्हा उपनिबंधक यांनी देखील तहसीलदार अमळनेर याना 19 जानेवारी 2023 रोजी पत्र देऊन शासन निर्णय 13 मे 2015 व 29 ऑगस्ट 2019 ची अंमलबजावणी करण्याबाबत पत्र दिले आहे. मात्र रक्कम उपलब्ध असूनही तहसीलदार नियमित कर्जदार शेतकऱ्यांना कर्ज माफी देत नसल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत होता. हेतुपुरस्कर शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या अमळनेर महसूल विभागाच्या निषेधार्थ मंगळवारी तहसील कार्यालयावर काळी गुढी उभारण्यात आली होती. यावेळी पोलीस निरीक्षक विजय शिंदे व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या आंदोलनात प्रा सुभाष पाटील, डॉ अनिल शिंदे, संदीप पाटील, सुरेश पाटील, प्रा अशोक पवार, गोकुळ बोरसे, भागवत सूर्यवंशी, बन्सीलाल भागवत, संदीप घोरपडे, राजू फाफोरेकर, जयवंतराव पाटील, प्रसाद शर्मा, विजय पाटील, मनोहर पाटील, गुलाबराव पाटील, त्र्यंबक पाटील, प्रमोद पाटील, भीमसेन पाटील, श्याम पवार, अशोक कदम, विकास पाटील, गौरव पाटील, सुनील शिंपी, नामदेव पाटील, राजेंद्र देशमुख, प्रवीण देशमुख, संजय सूर्यवंशी, जयेश पाटील, सुनील भालेराव आदी कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.







