
अमळनेर:- तालुक्यातील भरवस गावाजवळ पांझरा नदीतून वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर मारवड पोलिसांनी पकडुन गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भरवस बीट येथे अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्याने मारवड पोलीस ठाण्याचे पीएसआय विनोद पाटील, पो. कॉ. उज्वल पाटील हे गेले असता बेटावदकडून एक वाळूचे ट्रॅक्टर येताना दिसले. त्यास थांबवून विचारणा केली असता सदर ट्रॅक्टर गिरीश जयवंतराव पाटील रा. बेटावद याचे असून पांझरा नदीतून भरल्याचे सांगितले. वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर, ट्रॉली व वाळू असा तीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







