अमळनेर:- तालुक्यातील दहिवद गावातील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील मजुरांना महाराष्ट्र शासन अंतर्गत मध्यान्ह भोजन व्यवस्था सुरु करण्यात आली आले.
माजी उपसरपंच प्रवीण काशिनाथ माळी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गावातील सरपंच देवानंद बहारे, माजी उपसरपंच अनिल माळी, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पारधी,सुनील पाटील, मालुबाई माळी, हिराबाई भिल, वर्षा पाटील, योगिता गोसावी, आशाबाई माळी, वैशाली माळी, राजेंद्र सोनवणे, रोजगार सेवक भागवत सोनवणे,भूषण कोळी, गुलाब पाटील,एकनाथ सोनार, रोहिदास माळी, किरण माळी, ग्रामपंचायत कर्मचारी व मजूर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. महाराष्ट्र शासन अंतर्गत मध्यान भोजन व्यवस्था सुरू करण्यात आल्यावर सरपंच देवानंद बहारे व ग्रा. प. पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.