अमळनेर:- येथील मा नगरसेवक हाजी शेखा मिस्तरी, सामाजिक कार्यकर्ते राजु शेख अलाउद्दीन, सैय्यद मुख्तार अली यांच्या संकल्पनेतून आयोजित हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर नुकताच शहरातील ग्रामीण रुग्णालयात संपन्न झाले.
दरवर्षी मुस्लिम समाजातील भाविक पवित्र हज यात्रेसाठी सौदी अरेबियातील मक्का मदिना येथे जातात जाण्यापूर्वी शासकीय रुग्णालयातून वैद्यकीय तपासणी करणे सक्तीचे असते. या शिबिरात एकुण २६ हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांची ग्रामीण रुग्णालयात अल्प दरात सीबीसी, ब्लड शुगर, एक्सरे, केएफटी व ई सीजी, ह्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. वैद्यकीय तपासणी शिबिरासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताडे, डॉ संदिप जोशी यांच्यासह कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.