
अमळनेर:- दिल्ली येथे झालेल्या नॅशनल पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अमळनेर येथील दिनेश शशी बागडे याने अपंगत्वावर मात करत रौप्यपदक मिळवले आहे.

दिनेश बागडे याने १०७ किलो वजनी गटात ही कामगिरी केली असून अमळनेरचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे. यावेळी त्याने किशोर महाजन, मसल्स फॅक्टरी व क्रास फिट जिमचे विशेष आभार मानले आहेत. त्याच्या या कामगिरीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.







