अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथून १५ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली असून याबाबत मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी अशी की, मूळचे साक्री तालुक्यातील कुटुंबीय मांडळ येथे हल्ली मुक्कामाला असून शेतमजुरी करून गुजराण करतात. दिनांक ४ एप्रिल रोजी त्यांची १५ वर्षीय मुलगी ओसरीत खाटेवर झोपली होती. दिनांक ५ रोजी सकाळी उठून पहिले असता ती मिळून आली नाही. परिसरात शोध घेतला असता काहीच तपास न लागल्याने मुलीचे वडील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीसात फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास पो. ना. भरत गायकवाड हे करीत आहेत.