
पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांची संकल्पना…
अमळनेर:- जातीय सलोखा कायम ठेवावा व वातावरण चिघळू नये याकरिता संवेदनशील भागात पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या संकल्पनेतून कॉर्नर सभा घेण्यात आल्या.

नुकत्याच झालेल्या हिंदू मुस्लिम दंगलीच्या पार्श्वभूमीवर अमळनेरला काल दि.०५ एप्रिल रोजी संध्याकाळी ०७:३० ते ०८:२० वाजे पावेतो कसाली मोहल्ला, माळीवाडा, आखाडा मकान भाग येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे व पीएसआय अनिल भुसारे, पीएसआय नरसिंह वाघ, एएसआय विलास पाटील, पोना शरद पाटील, दीपक माळी, रविंद्र पाटील, सिद्धांत सिसोदे, योगेश महाजन, कैलास शिंदे, श्रीराम पाटील, अमोल पाटील, चालक मधुकर पाटील यांनी काॅर्नर सभा घेतल्या. सदर कॉर्नर सभेला मोठ्या प्रमाणावर तरूण उपस्थित होते. त्यांच्याशी चर्चा करत योग्य त्या सूचना देवून मार्गदर्शन करण्यात आले. एकमेकांच्या बद्दल मनातली तेढ व तीव्र विरोधाची भावना कशी कमी होईल यावर लक्ष दिले पाहिजे. सोशल मीडिया वर कोणतेही चुकीचे मॅसेज किंवा व्हिडीओ शेयर अथवा वायरल करु नये, कोणतीही चुकीची घटना होत असल्यास त्याची तात्काळ माहिती पोलीसाना द्यावी, कोणीही चुकीची अफवा पसरविणार नाहीत बाबत सूचित केली. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविणेबाबत सूचना यावेळी देण्यात आल्या. सदर कॉर्नर सभांना उत्तम प्रतिसाद मिळाला.







