तालुक्यात आधार संस्था व विप्रोने राबविला संयुक्त उपक्रम…
अमळनेर:- मागील चार महिन्यापासून आधार संस्थेने, विप्रो इंटरप्राईजेस अमळनेर यांच्या सहकार्याने ग्रामीण भागातील माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी विशेष डोळे तपासणीची मोहीम राबवली. ज्यात तालुक्यातील 30 ग्रामीण माध्यमिक शाळांचा समावेश असून प्रत्येक शाळेत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले व नंतर ज्यांना चष्म्याची आवश्यकता होती, त्यांना चष्मे वाटप करण्यात आले. तसेच ज्यांना डोळ्यांच्या विशेष समस्या होत्या त्यांना अमळनेर येथील गणेश हॉस्पिटल येथे नेत्ररोग तज्ञ डॉ.राहुल मुठे आणि डॉ. बिराज मुठे यांच्याकडून विशेष तपासणी करण्यात आली.
तालुक्यातील पाच हजार विद्यार्थ्यांची डोळे तपासणी करण्यात येवून चौदाशे विद्यार्थ्यांना चष्मे वाटप करण्यात आले. 36 विद्यार्थ्यांना इतर तपासण्यांचा लाभ देण्यात आला या मोहिमेची सांगता शिरुड येथे व्हीं झेड पाटील माध्यमिक शाळेत चष्मे वाटप करून करण्यात आली. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून तालुका गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील उपस्थित होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात या उपक्रमाबद्दल आधार संस्था आणि विप्रो कंपनीचे विशेष आभार मानले व पुढील सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाला विप्रो इंटरप्राईजेस कडून एच आर चेतन थोरात, क्वालिटी मॅनेजर जितेंद्र शर्मा आणि वेल्फेअर ऑफिसर सुधीर बडगुजर तसेच आधार संस्थेकडून अध्यक्षा डॉ. भारती पाटील, कार्य. संचालिका श्रीमती रेणू प्रसाद, प्रकल्प समन्वयक निकिता पाटील, नंदिनी मैराळे, तोसीफ शेख हे उपस्थित होते. मुख्याध्यापक शिंदे आणि सहकाऱ्यांनी सहकार्य केले.