
दाल बट्टीचा नैवेद्य दाखवून महाप्रसाद वाटप करून चैत्रोत्सवाची सांगता…
अमळनेर:- तालुक्यातील पाडळसरे येथील ग्रामदैवत अंबिका मातेचा चैत्रोत्सवात हनुमान जयंती व राम नवमीचे निमित्त साधून संत तुकाराम महाराज भजनी मंडळ व ग्रामस्थांकडून सालाबादप्रमाणे आयोजित हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमात काल्याचा किर्तनाने दाल बट्टीचा नैवेद्य दाखवून महाप्रसाद वाटून सांगता झाली

चैत्रोत्सवात राम नवमी व हनुमान जन्मोत्सव सालाबादप्रमाणे ग्रामवासी व संत तुकाराम महाराज भजनी मंडळाकडून साजरा करण्यात आला यात चैत्र शुद्ध अष्टमीला पूजाविधी करून आळंदी येथील नामवंत कीर्तनकार यांनी हजेरी लावत हरिनाम कीर्तन व श्रीमद भागवत कथेचे आयोजन केले होते. त्यात चैत्र चावादस निमित्त खीर व पुरणपोळीची आरतीचा भोग ग्रामवासीयांकडून दाखवून दुपारी पंच मंडळातील हभप मूलचंद पाटील ,छगन पाटील , शांताराम पाटील, युवराज पाटील, पत्रकार वसंतराव पाटील, मधुकर गुर्जर, जयराम पाटील यांच्याहस्ते ध्वज पूजन करून कुलस्वामिनी अंबिका माता व शिरागड वासिनी सप्तश्रृंगी मातेच्या नावे दोन भगवे ध्वज जोगवा भारुड, देवीचा महिमा गाऊन नाचत, वाजत गाजत लावण्यात आले.काल्याचा दिवशी हनुमान जयंती निमित्त श्रीहनुमान मूर्तीचे पांच नद्यांच्या पाण्याने पंचामृत स्नान घालून हभप ताराचंद पाटील व चंद्रशेखर पाटील यांनी सपत्नीक अभिषेक करून हभप उमेश पाटील ,हभप गोकुळ पाटील ,हभप आबासाहेब पाटील ,मुरलीधर पाटील ,प्रल्हाद पाटील यांच्या समूहाकडून सुंदरकांड व देवी महिमा गाण्यात आला ,पहाटे पाच वाजेपासून महिला मंडळाने महाप्रसादासाठी गोवरीवर दाल बट्टी शेकून देवीचा जागर करीत महाप्रसाद तयार केला तर सकाळी ८ ते १० यावेळात हभप भावेश महाराज विटनेरकर यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाचे मानकरी हभप रघुनाथ देवचंद पाटील यांच्याकडून शिरा व दाल बट्टीचा नैवेद्य दाखवून लाही काला व महाप्रसाद वाटून चैत्रोत्सवाची देवीची ओटी भरून देवीआरतीसह भागवत आरती करून सांगता झाली,चैत्रोत्सवात राम नवमी व हनुमान जन्मोत्सव कार्यक्रम यशस्वीतेसाठी संत तुकाराम महाराज भजनी मंडळ , जय शिवसरदार ग्रुप व महर्षी वाल्मिकी सह एकलव्य मित्र मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.







