
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अमळनेर प्रांतांना निवेदन…
अमळनेर:- महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्म दिनानिमित्त ११ एप्रिल रोजी शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली.

अमळनेर उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महात्मा फुले यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार व्हावा, तसेच भिडे वाड्यात मुलींसाठी शाळा उघडून शिक्षणाचे द्वार उघडे करणे, छ. शिवाजी महाराज यांची समाधी शोधणे, पोवड्याच्या माध्यमातून शिवचरित्र घरोघरी पोहचवणे, प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले जावे अशी मागणी करनारे पहिले समाजसुधारक, यासह वेगवेगळ्या कार्याची माहिती मिळण्यास प्रेरणा मिळावी ह्या हेतूने ११ एप्रिल रोजी सुट्टी जाहीर करावी अशी मागणी करण्यात असून निवेदन देतेवेळी ज्ञानेश्र्वर पाटील, संदीप घोरपडे, लक्ष्मण शिंदे, नरेंद्र पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते







