
अल्पवयीन पिडीतेवर अत्याचार प्रकरणी अमळनेर कोर्टाचा निकाल…
अमळनेर:- येथील न्यायालयाने काल दिनांक १० एप्रिल रोजी पोक्सो कलमाअंतर्गत एकाला १२ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी शरद सखाराम भील रा. नारणे ता. धरणगाव याने स्वतःचे लग्न झालेले असताना ही अल्पवयीन पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून सुमारे मे २०१९ ते मार्च २०२० दरम्यान एक वर्ष शारीरिक संबंध ठेवले. त्यातून पीडितेला दिवस गेले असता त्याने लग्नास नकार दिल्याने पीडितेने जून २०२० मध्ये चोपडा शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. दरम्यान पिडीतेने लहान बालकास जन्म दिलेला आहे. अमळनेर कोर्टात न्यायाधीश पी आर चौधरी यांच्या समोर खटल्याचे कामकाज चालले. सरकारी वकील आर बी चौधरी यांनी एकूण ९ साक्षीदार तपासले. त्यावरून कलम ३६३, ३६६ मध्ये व पॉक्सो ॲक्ट अंतर्गत १२ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.







