अमळनेर:- कला व क्रीडा शिक्षक समन्वय समिती,धुळे तसेच अमळनेर तालुका क्रीडा समिती, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जन्मोत्सव निमित्ताने राज्यस्तरीय गुण गौरव सोहळा अंबिका मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार शिरीष चौधरी होते.
प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार स्मिता वाघ, खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष हरी भिका वाणी, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, मेजर राजेंद्र श्याम यादव, महेंद्र सुदाम महाजन,धार सरपंच दगडू सैंदाणे हजर होते.
राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती भरत रंगनाथ पवार (देवळा), प्रा.डॉ. माधव कौतिक कदम (नंदुरबार), सिद्धार्थ अरुण सोनवणे (पुणे) दिनेश रमेश मोरे (मारवड), राहुल (अंबादास) भिला येवला (योग तज्ञ, नाशिक), शेख चाँद पी.जे. ( जालना), सुधीर शांताराम चौधरी (तांदळी), बाबासाहेब मल्लापा अरुने (मोहोळ जि.सोलापूर), अनिता संदीप पाटील (गोरगांव, मुंबई), मंगला हंसराज सोनवणे (अमळनेर), सतिश अर्जुन मंगळे (नंदुरबार)प्रा.डॉ. आसिफ खान अजमल खान (जळगाव) ,प्रा. प्रदीप प्रकाश इन्शुलकर (धुळे) प्रा.गिरीश पाटील (पाचोरा), प्रभाकर गजानन पाटील (रणाईचे ), प्रा.प्रमोद साहेबराव पाटील (धुळे), बळीराम काशिनाथ आढाव (विसरवाडी ता.जि.नंदुरबार), योजना अल्पेश ठक्कर (अमळनेर), मनोहर कौतिक पाटील (अमळनेर), नितीन मुरलीधर भदाणे (रांगोळी व चित्रकार, अमळनेर)तुषार नारायण बोरसे (नगांव गडखांब), संजय राम बोरसे ( शिरसाळे) वामन आनंदा चव्हाण(अमळनेर) संजय केदारराव पवार (कोच, एस.टी.महामंडळ), विश्वास नाना पाटील(धुळे) रामदास लोटन माळी, किशोर नाना पाटील, किरण प्रकाश सनेर, कैलास आनंदा पाटील, पत्रकार जितेंद्र ठाकूर, महेंद्र रामोसे, आर जे पाटील, समाधान मैराळे, राहुल बहिरम यांना स्मृती चिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच अवघ्या काही महिन्यात तीन गुन्हेगारांवर एमपीडीए कारवाई करणारे व अवघड गुन्ह्याचे डिटेक्शन करून देशातील सराईत गुन्हेगारांना अटक केल्याबद्दल पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांचा विशेष स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याचे संयोजन कला व क्रीडा शिक्षक समन्वय समिती, धुळे संस्थापक अध्यक्ष हेमंत भदाणे,सचिव राहुल एच.पाटील, उपाध्यक्ष वासुदेव शेलकर, अमळनेर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष सुनील वाघ,कार्याध्यक्ष संजय पाटील,निलेश विसपुते, अतुल बोरसे,बापूराव सांगोरे, एन.एल.पाटील, आर.टी. बागुल, आनंद धनगर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार सुनिल पी. वाघ यांनी मानले.