अमळनेर कोर्टाने सुनावला २० वर्ष सश्रम कारावास…
अमळनेर:- येथील अमळनेर न्यायालयात दाखल खटल्यात अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत अत्याचार केल्याच्या घटनेत आरोपीस विविध कलमाखाली सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दीपक रवींद्र भील रा. अकुलखेडा ता. चोपडा याने त्याच गावातील १४ वर्षीय मुलीस फुस लावून पालकांच्या रखवलीतून पळवून नेले. व सोलापूर जिल्ह्यातील देवळाली येथे ते भाड्याने घर घेवून राहू लागले. पोलीसांनी तपास करत त्यांना ताब्यात घेतले. त्यानतंर मुलीने जबाब दिला की, दिपकने धमकी दिल्याने त्याच्या सोबत गेली असून त्याने वेळोवेळी अत्याचार केला असल्याचे नमूद केले. न्यायाधीश पी आर चौधरी यांच्या समोर खटल्याचे कामकाज चालले.सरकारी वकील ॲड शशिकांत पाटील यांनी १४ साक्षीदार तपासले. या आरोपीस ३६३ कलमात ७ वर्ष, पोक्सो ॲक्ट अंतर्गत २० वर्ष सश्रम कारावास, व कलम ८ अंतर्गत ३ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली असून चोपडा पोलिसांनी जामिनावर असलेल्या आरोपीस ताब्यात घेतले आहे.