व्हॉईस ऑफ मिडिया व महा. राज्य पत्रकार संघटनेने केले आवाहन…
अमळनेर:- पशु ,पक्षी हे निसर्गाचे एक महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्यामुळे पर्यावरण संतुलन राहण्यास मदत होते. उन्हाळा या ऋतूमध्ये पाणीटंचाईत मनुष्य त्याची तहान भागवून घेतो. मात्र पशुपक्ष्यांना पाणी नाही मिळाले तर उन्हाळात पशु ,पक्षी तडफडून दगावतात. म्हणून पाण्याने भरलेली जलपात्रे (भांडी)झाडाला टांगली तर त्या भांड्यातील पाणी पशु, पक्षी पितात,पाण्याची भांडी भरून पक्ष्यांची तृष्णा भागवावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य व व्हाइस ऑफ मिडिया या दोन्ही पत्रकार संघटनांनी केले आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील, अमळनेर विधानसभा आमदार अनिल पाटील,माजी आमदार स्मिता वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे विभागीय संघटक तथा व्हाइस ऑफ मिडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष डिंगबर महाले, महा. राज्य पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत काटे,व्हाईस ऑफ मिडिया चे तालुकाध्यक्ष अजय भामरे, सचिव जितेंद्र पाटील, गौतम बिऱ्हाडे, जयंत वानखेडे यासह आदी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.