
अमळनेर:- पारोळा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत नुकतेच निवडून आलेले जितेंद्र शेवाळकर यांचा मारवड येथे सत्कार करण्यात आला.

पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडली. यावेळी व्यापारी मतदार संघातून जितेंद्र मधुकर शेवाळकर हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. अतिशय कष्टमय परिस्थितीतून त्यांनी भरारी घेतली असून पारोळा बाजार समितीत त्यांनी मापाडी म्हणून काम केले असून त्यानतंर स्वतः व्यापार व्यवसायास सुरुवात करत त्याच बाजार समितीत संचालक म्हणून निवडून आले आहेत. अमळनेर तालुक्यातील मारवड येथे स्नेहींच्या माध्यमातून भेट देण्यास आले असता त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उंदिरखेडा येथील माधवराव रोहिदास पाटील, माजी कृ.ऊ.बा. संचालक उमाकांत दिनकर साळुंखे, दिलीप गुलाबराव पाटील, प्रकाश आधार पाटील, विजय पोपटराव साळुंखे, डॉ. विलास पाटील आदी मान्यवरांनी त्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या.








