अमळनेर:- तालुक्यातील हिंगोणे सीम येथे गावठी दारू विक्रेत्यावर मारवड पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एपीआय शितलकुमार नाईक यांना मिळालेल्या माहितीनुसार पोना सुनील तेली, हेकॉ संजय पाटील, हेकॉ फिरोज बागवान यांनी हिंगोणे सीम येथे छापा टाकला असता समाधान जगतराव कोळी हा गावठी दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याजवळ २५ लिटर गावठी दारू मिळून आली. पोलिसांनी नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा जागीच नाश केला. पोना सुनील तेली यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत