अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथील ३४ वर्षीय तरुणाची गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दिनांक २१ रोजी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मांडळ येथील ३४ वर्षीय तरुण दीपक हिरालाल मराठे याने दिनांक २१ रोजी घरी कोणी नसताना राहत्या घरी स्वयंपाक घरात छताच्या लाकडी सरीला दोरीने गळफास लावून जीवनयात्रा संपविली. त्याचे वडील हे बकरी चारण्यास गेले होते व आई ही प्रेतयात्रेस गेली असल्याने तो घरी एकटा होता. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी तो लग्न होत नसल्याच्या विवंचनेत असल्याचे माहिती मिळाली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे. मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो ना भरत गायकवाड हे करीत आहेत.