
त्यांच्या जागी नंदुरबार येथील पो. नि. सुनील नंदलवार यांची पदोन्नतीने नियुक्ती…
अमळनेर:- जळगाव जिल्ह्यातील एकूण अकरा पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून अमळनेर पोलीस उपविभागीय अधिकारी राकेश जाधव यांची जालना येथे पोलीस ट्रेनिंग सेंटर येथे बदली झाली आहे.

त्यांच्या जागी नंदुरबार येथून पोलीस निरीक्षक सुनील दिगंबर नंदलवार यांची पदोन्नतीने अमळनेर पोलीस उपविभागीय अधिकारीपदी बदली झाली आहे. राकेश जाधव यांची बदली झाली असली तरी ते त्यांच्या सीसीटीव्ही अभियानामुळे चांगलेच चर्चेत आले होते. शहरासह ग्रामीण भागात चोरीच्या व इतर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मोहीम त्यांनी यशस्वी केली होती.








