
वावडे येथे एकावर पोलिसांची कारवाई….
अमळनेर:- तालुक्यातील ग्रामीण भागात सट्टा जुगाराचे अड्डे फोफावले असून मारवड पोलिसांनी वावडे येथे एकास सट्टा घेताना रंगेहाथ पकडले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील वावडे येथे सट्टा लावला जात असल्याची माहिती मिळाल्याने मारवड पोलिसांच्या पथकाने वावडे येथे छापा टाकला असता श्रीकांत शांताराम पाटील (वय ४२) हा लोकांकडून आकडे लावण्यासाठी पैसे घेताना रंगेहाथ मिळून आला. त्याच्याकडून सट्टा जुगाराचे साहित्य व ५२० रू. रोख मिळून आले. याबाबत मारवड पोलीसात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १२ अ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सपोनि शितलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ भरत श्रीराम ईशी हे करीत आहेत.








