अमळनेर:- तालुक्यातील निम येथे तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा विक्री करणाऱ्या दोघांवर मारवड पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.मात्र तालुक्यात व ग्रामीण भागात प्रत्येक गावात ह्या पदार्थांची सर्रास विक्री सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निम येथे तंबाखूजन्य पदार्थ विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस त्याठिकाणी पोहचले असता गावातील पान सेंटर चालक रावसाहेब पाटील याच्याकडून विक्रीच्या आणलेले तंबाखू, बीडी, सिगारेट हे साहित्य आढळून आले. तसेच दुसरा पान सेंटर चालक गणेश भील यांच्याकडे यांच्याकडे ही तंबाखूजन्य पदार्थ विक्रीच्या उद्देशाने आणल्याचे आढळून आले. त्यावरून मारवड पोलीसात तंबाखूजन्य पदार्थ विक्री कायदा कलम ६ व २४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोउनि बाळकृष्ण शिंदे करीत आहेत.