अमळनेर:- तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथे अवैधरित्या देशी दारुची विक्री करणाऱ्या एकावर मारवड पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथे अवैध देशी दारुची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्याने सपोनि शितलकुमार नाईक यांच्या आदेशाने मारवड पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असता मूडी प्र. डांगरी गावाच्या बाहेर लोण रोडवर एक इसम बियर शॉपीच्या बाजूला शेतात पत्री शेडमध्ये पिशव्या घेवून बसल्याने आढळल्याने त्यास पकडले असता त्यांच्याकडून देशी दारूच्या दहा बाटल्या जप्त करण्यात आल्या असून आरोपी बाबूलाल रतन भोई याच्याविरुद्ध पोना भारत गायकवाड यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीसात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोना हे करीत आहेत