विभागप्रमुखांनी दिली विविध योजनांबद्दल माहिती…
अमळनेर:- एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय व संरक्षण अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गंगाराम सखाराम हायस्कूल यांच्या सभागृहात स्त्री शक्ती समस्या समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार स्मिताताई वाघ व प्रमुख पाहुणे म्हणून कृ.उ.बा. संचालक हिरालाल शांताराम पाटील तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. शिबीर मोठया उत्साहात संपन्न झाले .
प्रास्ताविक बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती प्रेमलता पाटील यांनी केले तर उपस्थित महिलांना स्मिताताई वाघ व हिरालाल शांताराम पाटील यांनी मार्गदर्शन केले.तसेच सर्व विभागप्रमुखांनी त्यांच्या योजनांबद्दल माहिती दिली. संरक्षण अधिकारी श्रीमती योगिता चौधरी यांनी महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरोधात महिलांच्या कायद्यांबद्दल माहिती दिली.या प्रसंगी सभागृहाच्या बाहेर शासनाच्या विविध योजनांचे स्टॉल लावून त्या ठिकाणी महिलांच्या समस्यांचे अर्ज भरून घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती भाग्यश्री पाटील व श्रीमती सुजाता चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अल्का पाटील,संगीता पगारे, अरुण बोरसे,समाधान पाटील, किरण बडगुजर, भानुदास पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.