
अमळनेर:- तालुक्यातील पाडसे येथे गावठी दारू विकणाऱ्या एकावर मारवड पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सपोनि शितलकुमार नाईक यांच्या आदेशाने सफौ किशोर पाटील, हेकॉ सचिन निकम, पोना सुनील तेली याच्या पथकाने पाडसे येथे छापा टाकला असता प्लॉट भागात सतीश भिला पाटील हा राहत्या घराच्या आडोश्याला गावठी दारू विक्रीच्या उद्देशाने बसून असल्याचे दिसून आल्याने त्यास रंगेहाथ पकडले. त्याच्याकडे ३० लिटर गावठी दारू मिळून आली असून नमुने घेवून उर्वरित दारूचा जागीच नाश करण्यात आला. पोना सुनील तेली यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.








