राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाच्या राज्यस्तरीय शिबिराचे १६ जून रोजी आयोजन…
अमळनेर:- राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाच्या राज्यस्तरीय शिबिराचे १६ जून रोजी अमळनेरात आयोजन करण्यात आले असून १४ वर्षानंतर शरदचंद्र पवारांचे तालुक्यात आगमन होणार आहे.
राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाच्या प्रदेश समन्वयक रिता बाविस्कर यांनी राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाच्या राज्यस्तरीय शिबिराचे १६ जून २०२३ रोजी अमळनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे आयोजन केले आहे. या शिबीराला खा. शरदचंद्र पवार, जयवंतराव पाटील, विरोधीपक्ष नेते अजित पवार, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती रिता बाविस्कर यांनी दिली आहे. शरदचंद्रजी पवार अमळनेर तालुक्यात याआधी २००९ साली आले होते. त्यांच्या आगमनाच्या बातमीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.