पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देत केला गौरव…
अमळनेर:- तालुक्यातील अनेक गावातील ग्रामपंचायतीमार्फत शासनाच्या आदेशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देत कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला.
तालुक्यातील मारवड येथे ग्रामपंचायतीकडून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने श्रीमती प्रभावती जयवंतराव साळुंखे व प्रतिभा रवींद्र साळुंखे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सरपंच आशाबाई सुभाष भील, उपसरपंच भिकन पाटील, ग्रामपंचायत सदस्या सीमा साळुंखे, शीतल साळुंखे, रजनी गुरव, उज्वला पाटील, कविता चौधरी, श्रीमती कोळी, गणेश साळुंखे, ग्रामसेवक रवींद्र सनेर, मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष जयवंतराव पाटील, रविंद्र पाटील, सचिन पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते.
मुडी बोदर्डे येथे सुनीता तुषार सैंदाणे, अंगणवाडी मदतनीस विजया विश्वास महाले, कविता बोरसे यांना पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण संदानशिव, ग्रामसेवक राहुल पाटील, निवृत्त कृषी सहाय्यक बोरसे, सामाजिक कार्यकर्ते कैलास पाटील, तुषार सैंदाणे, अविनाश पाटील, शितल पाटील, सुनंदा चव्हाण, आशाबाई भिल, नितीन पाटील, लहू चव्हाण, अंगणवाडी सेविका अलका सैंदाणे, सुनील कोळी, लहू चव्हाण, नानाभाऊ चव्हाण पप्पू भाऊ मतकर, राजू मतकर अजय देडगे, मनोज देडगे, आदी उपस्थित होते.
तालुक्यातील आदर्शगाव सुंदरपट्टी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली. त्या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी सरपंचा सुरेखा सुरेश पाटील, व आशासेविका प्रतिभा नाना पाटील यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी सुंदरपट्टी सरपंच अर्चना प्रेमराज पाटील, मा. सरपंच सुरेश अर्जुन पाटील, ग्रामसेवक दीपक सोनवणे, सुरेश हिरामण धिवरे, ग्रा. सदस्य दीपक नंदू पाटील, सदस्या भिकुबाई भील, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक जगताप सर, अंगणवाडी शिक्षिका, आशाताई, ग्राम पंचायत कर्मचारी व गावातील मान्यवर उपस्थित होते.
तालुक्यातील सबगव्हाण येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने मनीषा अविनाश पाटील यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक नितीन मराठे, उपसरपंच दगडू पाटील,ग्रा सदस्य विनायक पाटील,विठ्ठल पाटील, शोभाबाई पाटील,सुनंदा पाटील, रोजगार सेवक सूर्यकांत पाटील, माजी ग्रा.प. सदस्य भालचंद्र पाटील, वि का सोसायटी सदस्य डॉ. अविनाश पाटील, ग्राम रोजगार सेवक दादाभाऊ पाटील आदी उपस्थित होते.