
अमळनेर:- इयत्ता दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून निकालाची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली असून दहावीचा निकाल उद्या २ जून दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.

महाराष्ट्र बोर्ड १०वीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. आता दहावीचे विद्यार्थी आपल्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. या वर्षी महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेला सुमारे 32 लाख विद्यार्थी बसले होते. शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थी आणि पालक १० वीचा निकाल पाहू शकतात.
कुठे व कसा पाहणार निकाल
निकाल पाहण्यासाठी शिक्षण मंडळाचे अधिकृत संकेत स्थळ www.mahresult.nic.in ला भेट द्या. होम पेजवर जा आणि महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल 2023 या लिंकवर क्लिक करा.
खालील वेबसाईटवर भेट देवून ही तुम्ही निकाल पाहू शकता…
https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board
या संकेतस्थळांवर तुमचा रोल नंबर, शाळेचा कोड आणि इतर माहिती भरा. परीक्षेचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल. त्यानंतर विद्यार्थी त्यांचा निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात.







