
अमळनेर:- मान्सूनपुर्व देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आज शनिवारी तालुक्यात आठ तास वीज पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महावितरणच्या अभियंत्यांनी दिली आहे.

शनिवार दिनांक ३ जून रोजी १३२ केव्ही उपकेंद्र येथून निघणाऱ्या सर्व ३३ केव्हीं वाहिनीचा विज पुरवठा सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अतिमहत्वाच्या मान्सूनपुर्व देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार आहे. त्यामुळे अमळनेर तालुक्यातील वीज पुरवठा सुद्धा सकाळी ९ वाजे पासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. कृपया सर्व वीज ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन विज वितरण कंपनीचे अमळनेर शहर कक्ष १ चे सहाय्यक अभियंता वैभव देशमुख यांनी केले आहे.








